पवारांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्यानंतर अजित पवार मातोश्रीवर दाखल
मुंबई, ६ जुलै : राज्यात २ जुलैला झालेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चर्चा झाली. या चर्चेत गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते. मात्र या बैठकीत नक्की काय निर्णय झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आज मातोश्रीवर जवळपास ४५ मिनिटे यावर चर्चा झाली.
दोन दिवसांपूर्वीच पारनेरमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी अंतर्गत राग आहे. अनेक बदल्या होत असून त्या बदल्याही रद्द करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून थोड्याचवेळात उपमुख्यमंत्री अजित पवार मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड मातोश्रीवरून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता पारनेरमधील मुद्द्यावर अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार असल्याचे समजते.
महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे ही नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहावं लागणार आहे.
News English Summary: NCP President Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray discussed the transfer of Deputy Commissioner of Police in the state on July 2. Home Minister Anil Deshmukh was also present at the discussion. It is unknown at this time what he will do after leaving the post.
News English Title: Important meeting between Sharad Pawar and chief minister Uddhav Thackery at Mumbai News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा