15 December 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कितीही चिखल केला तरी देखील कुठेही कमळ फुलू देणार नाही: आ. आदित्य ठाकरे

Shivsena MLA Aaditya Thackeray, MLA Rohit Pawar, BJP

नागपूर: शिवसेनेचे युवा नेते आणि पहिल्यांदाच आमदार बनलेले आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टोला हाणला आहे आणि त्यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख हा भाजपवर होता हे स्पष्ट होतं. सत्ताच्या लोभापोटी मित्राना कसे डावलले जाते हे आपण पाहिले असल्याचेही ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरील चर्चेत विचार मांडत असताना शिवसेनेचे युवा नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर नाव न घेता घणाघात टीका केली. यावेळी अप्रत्यक्ष टोलेबाजी करत म्हटले की, ‘कितीही चिखल केला गेला असला तरी देखील आम्ही कुठेही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाला पक्ष करत खडे बोल सुनावत सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. रोहित पवार म्हणाले, विरोधी पक्षाकडे विरोध करायला कुठलेही कारण नाही. ते अकारण टीका करत आहे. ते रडीचा डाव खेळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवसेना तुटेल पण भारतीय जनता पक्षासमोर वाकणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Web Title:  Shivsena MLA Aaditya Thackeray Slams BJP Party Over Clashes with Shivsena Party after Mahavikas Aghadi Govt Formation.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x