19 January 2022 12:50 AM
अँप डाउनलोड

'एनी टाईम मिल्क' एटीएम मशिन लोकार्पण : नाशिक

नाशिक : ‘एनी टाईम मिल्क’ एटीएम मशिनचं आज नाशिकमध्ये लोकार्पण करण्यात आलं. पैसे काढण्याची एटीएम मशिन ही सर्वानाच परिचित आहे, परंतु नाशिक मध्ये एक वेगळाच प्रयोग करण्यात आला असून हे एटीएम मशिन चक्क केव्हां ही दुध करण्यासाठी ग्राहक वापरू शकतात.

या ‘एनी टाईम मिल्क’ एटीएम मशिन मुळे ग्राहकांचा थेट फायदा होणार असून, दलालांच्या नफ्याला ही चाप लावण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. शेतकऱ्याचा सर्व फायदा दलालच कमवून जायचा आणि शेतकरी मात्र नेहमी त्याबाबतीत नुकसान सहन करायचा. अशा प्रकारच्या ‘एनी टाईम मिल्क’ एटीएम मशिन मुळे ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा थेट फायदा होणार.

राज्यातील या प्रयोगाची पहिल्यांदाच सुरुवात आज नाशिक मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. नाशिकमधील कॉलेज रोडवरील बॉईज टाऊन स्कूलसमोर हे एटीएम सिन्नर दूध उत्पादन संघाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

#Nashik(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x