27 July 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

नितांत अलिबाग किनारा

अलिबाग जवळच असलेला कुलाबा जलदुर्ग दक्षिणोत्तर 267 ते 927 मीटर लांब आणि पूर्वपश्चिम 109 मीटर रुंद अशा बेटावर आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. सुरूची उंच उंच झाडे, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं, गालिचा अंथरल्यासारखी मऊशार वाळू, समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारासारखा ताठ मानेने उभा असलेला कुलाबा किल्ला. हे वर्णन आहे अलिबाग बीचचं. अलिबाग बसस्थानकात उतरल्यानंतर साधारण 1 कि.मी. पश्चिमेला चार ते पाच कि.मी. लांबीचा वालुकाम समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किनारा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जात असला तरी अलीकडे हातगाडी वाल्यांची गर्दी येथील शांतता भंग करते, यात शंका नाही. अलिबागपासून नैरृत्येस सुमारे 300 मीटर अंतरावर कुलाबा किल्ला आहे.

भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात 3-5 कि.मी. नैरृत्येकडे 60 फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सांयकाळाच्या वेळेस अलिबाग समुद्र किनार्‍यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळतीला जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य बुडल्यानंतरही त्याच्या नयन मनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी आलेले आणि आपल्याच तंद्रीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात.

तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छीमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग समुद्र किनार्‍यावर सूर्यास्तात जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदयदेखील आहे. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्‍यावरील बंगले, मंदिरे, लांबावर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते.

अलिबागचा समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनार्‍याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे लागते.

हॅशटॅग्स

राहुन गेलेल्या बातम्या

x