12 August 2020 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला सुरवात.

आंगणेवाडी, मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला आजपासून सुरवात झाली. ही जत्रा दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द आहे. मसुरे आंगणे मंडळ आणि स्थानिक शासकीय यंत्रणांकडून या यात्रेची संपूर्ण तयारी झाली आहे. सकाळी पहाटेपासून भाविक दर्शनाला सुरुवात करतील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भावीक भराडी देवीचे केवळ अर्ध्या तासात दर्शन घेऊ शकतील असे व्येवस्थापन आंगणे मंडळ म्हणजे देवस्थान मंडळाने केले आहे. प्रसिध्द करण्यात माहिती नुसार भाविकांसाठी एकूण नऊ रांगांची व्यवस्था देवस्थान मंडळाने केली असून यावर्षी कमीत कमी आठ लाख भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मसुऱ्याची आंगणेवाडी अगदी भक्तिमय झाली असून, संपूर्ण गाव रोषणाईने उजळून निघाले  आहे. जत्रे दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये कृषी प्रदर्शन, फ्लावर शो आणि सिंधु सरस महोत्सव यांचा समावेश आहे.

यंदा शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्याने यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्तं केली जात आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x