28 September 2020 9:35 PM
अँप डाउनलोड

नाशिक भाजप आमदाराचे प्रताप : देशभक्तीच्या कार्यक्रमात नाचवल्या मुली

नाशिक : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा होताना तुम्ही अनेक वेळा विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन झाल्याचे अनेकदा अनुभवले असेल. परंतु नाशिक भाजप याला अपवाद ठरली आहे. होय कार्यक्रम होता देशभक्तीचा म्हणजे २६ जानेवारी, पण भाजपचे विधान परिषदेचे आमदार अपूर्व हिरे यांनी या देशभक्तीच्या कार्यक्रमात चक्क अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींच नृत्य आयोजित केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हे सर्व इतक्यावरच थांबलं नाही तर तर या कार्यक्रमात मुलींनी उपस्थितांसमोर आणि भाजपचे आमदार अपूर्व हिरे यांच्या उपस्थितीत अश्लील हावभाव करत नाच केला. हे सर्व इतक्यावरच थांबलं नाही तर उपस्थितांनी थेट व्यासपीठावर जाऊन त्या नृत्य करणाऱ्या तरुणींवर हातात तिरंगा धरत पैसे ही उधळले.

प्रजासत्ताकदिनीच असे अश्लील घाणेरडे कार्यक्रम आयोजित केल्याने संबंधित आमदारांवर आणि भाजपवर संपूर्ण नाशिककरांकडून प्रचंड चीड व्यक्तं केली जात आहे. भाजपची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची देशभक्ती नाशिककरांसमोर आल्याने अनेक संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण नाशिक मधून उमटत आहेत.

प्रजासत्ताक दिनी असे अश्लिल आणि घाणेरडे प्रकार करताना भाजप कार्यकर्त्यांना लाज कशी वाटली नाही अशी चीड व्यक्तं होत असून, नाशिक मधील स्त्रीवर्गातून खूप रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे भाजपच देशभक्ती आणि संस्कृतीवरचं प्रेम हे केवळ दिखावा असल्याचं नाशिक मध्ये मत व्यक्तं होऊ लागलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Republic Day at Nashik(1)BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x