26 May 2022 7:45 PM
अँप डाउनलोड

विदर्भातून शिवसेनेनला हद्दपार करा : आशिष देशमुख

अमरावती : आपल्याच पक्षविरोधात जाऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी विदर्भात शिवसेनेविरोध दंड थोपटले. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला म्हणजे त्यांच्या सर्व आमदार आणि खासदारांना विदर्भातून हद्दपार करण्याचे आव्हाहन त्यांनी केले.

इतकंच नाही तर अमरावती, अकोला आणि बुलढाण्यातील जनतेने शिवसनेच्या सर्व आमदार आणि खासदार ‘चले जाव’ म्हणत वेगळ्या विदर्भाच्या मागणीला बळ द्यावं.

आशिष देशमुख हे भाजपचे विदर्भातील काटोल चे आमदार आहेत. त्यांनी आपल्याच पक्षविरोधात दंड थोपटले असून त्यासाठी त्यांनी विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांत आत्मबळ यात्रा सुरु केली असून ते याच यात्रेदरम्यान अमरावती येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला विरोध असून त्यात आता शिवसेना भाजपशी युती करणार नसल्याचे जाहीर केल्याने आणि मुख्य म्हणजे भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याने आता भाजपच्या या मागणीचा मोठा अडथळाच दूर झाल्याने भाजप आमदार आशिष देशमुख यांनी पुन्हा आत्मबळ यात्रे मार्फत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. विदर्भातील कापूस उत्पादक संकटात असल्याने याच यात्रेदरम्यान त्यांनी स्वतःच्या पक्षातील कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर ही टीका केली.

हॅशटॅग्स

#Ashish Deshmukh(2)#Vidarbha(2)BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x