27 July 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

शरद पवारांची मोदींसोबत तब्बल पाऊण तास चर्चा

PM Narendra Modi, NCP President Sharad Pawar

नवी दिल्ली: एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरु होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली.

या महिन्याच्या सुरुवातीला मी नाशिक आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. परतीच्या पावसामुळे राज्यातील बहुंतांश भागात सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे, याकडे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांनी ही भेट आटोपल्यानंतर या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. परंतु शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक आटोपल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तातडीने मोदींची भेट घेऊन चर्चा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रश्नावर शरद पवार हे आज पंतप्रधानांची भेट घेणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसं स्पष्टही करण्यात आलं होतं. अपेक्षेप्रमाणे ही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. पवारांनी स्वत: ट्विट करून या चर्चेचा तपशील सांगितला आहे. अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांतील ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली,’ असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणीही पवारांनी यावेळी केली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x