7 July 2020 10:08 PM
अँप डाउनलोड

हा शरद पवार स्टाइल गोल आहे; तुम्ही दोनदा नक्कीच पाहाल: अमेय खोपकर

Sharad Pawar, NCP, MNS, Ameya Khopkar

मुंबई: राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्यातरी सरकार स्थापनेला मोठा विलंब होणार हे निश्चित आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द झाली असून, ही बैठक आज, बुधवारी होणार आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडीत सामील होण्यास काँग्रेसला मुळीच हरकत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हक्क ही शिवसेनेची मूळ भूमिका आहे आणि ती आपल्या विचारसरणीच्या आड येणार नाही, असे या नेत्यांनी त्यांना सांगितले, तसेच एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर या अडचणी राहणार नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ए. के. अँथनी, के. सी. वेणुगोपाल आदी नेत्यांचा बिगरमराठी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे, पण ती भूमिका आता कालबाह्य ठरल्याचे नेत्यांनी सोनिया गांधी यांना पटवून सांगितले.

राज्यातील सत्तास्थापनेवरून चर्चा आणि बैठक संपण्याचं नाव घेत नसताना, पवारांची रोजची नवं-नवीन वक्तव्य अनेक प्रश्न निर्माण करत असल्याने मुरलेले राजकारणी देखील विचारात बुडाले आहेत. एकूणच संपूर्ण राजकारण पवार केंद्रित झाल्याने, पवार नेमकं काय करणार आहेत याचा कोणालाही अजून काहीच कळेनासं झाल्याने उत्सुकता अजून वाढताना दिसत आहे.

सत्तास्थानापनेच्या खेळात केंद्रस्थानी आलेल्या शरद पवार यांना अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन फुटबॉलच्या मैदानातील एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला “हा शरद पवार स्टाइल गोल आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच हा व्हिडिओ तुम्ही नक्की दोनदा पाहाल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(631)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x