15 August 2022 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

..तर यापुढे राज ठाकरे राजकारण करत केवळ मनसेचा फायदा बघणार? सविस्तर वृत्त

BJP, MNS, Raj Thackeray

नाशिक: सध्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवडे उलटले असले तरी सरकार स्थापन झालेले नाही. त्यात शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत उघड विरोध करत, केवळ मुख्यमंत्री पद मिळावं या बहाण्याने थेट युतीच तोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची विचारधारा पूर्णपणे विरुद्ध दिशेला आहे आणि तरी देखील उद्धव ठाकरे यांनी पक्ष टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी थेट धाडसी निर्णय घेतला. उद्धव ठाकरे संयमी असले तरी प्रथम पक्ष हित आणि राजकीय स्वार्थ यालाच कोणताही मागचा पुढचा विचार न करता प्राधान्य देतात असा मागील इतिहास सांगतो.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकरण असं सांगणारी शिवसेना सध्या ९९ टक्के राजकरण आणि १ टक्के समाजकारण याचं तत्वावर उद्धव ठाकरे चालवत आहेत आणि त्यासाठी कोणत्याही अभद्र युती किंवा आघाडी करताना मागेपुढे पाहत नाहीत हे अनेक महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचा निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, दुसऱ्याबाजूला तत्व आणि गुणवत्ता यामध्ये गुरपटलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे मला कधीतरी लोकं स्वीकारतील या चमत्काराची वाट पाहत आहेत, जे निव्वळ भीषण स्वप्नंच आहे.

वास्तविक पक्ष वाढविण्यासाठी आधी पक्ष टिकवणं गरजेचं असतं आणि स्थानिक पातळीवर पक्षहिताचे स्वार्थी राजकीय निर्णय घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देणं गरजेचं असत हे राज ठाकरे यांनी स्वीकारणं गरजेचं आहे. राज ठाकरे हे गुणी आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत हे सत्य असलं तरी, आधी त्यांनी मतदारला दूरदृष्टी कळत नाही हे स्वीकारलं तर त्यांचं राजकरण आधीक सोपं आणि सुखकारक होऊन जाईल. राज ठाकरे यांना हवा असलेला महाराष्ट्र घडवायचा असेल तरी आधी लोकसभेत, विधानसभेत, महापालिकेत, नगरपालिकेत, जिल्हापरिषदेच्या आणि ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त प्रतिनिधी स्वार्थी राजकीय विचार आणि निर्णय घेऊन पाठवावे लागतील, जसं शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष करत आहेत.

विधानसभा निवणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध विखारी प्रचार करून उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांच्यासोबत महाशिवआघाडी थाटली आहे. विशेष म्हणजे असा स्वार्थी राजकीय निर्णय घेताना मतदार आणि तत्व तसेच पक्षीय विचारधारा सर्वकाही धाब्यावर बसविण्यात आलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्षांनी देखील तोच राजकीय फायदा बघत भाजपशी खुली जवळीक वाढवणं आणि पक्षविस्तार करणं गरजेचं आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आजही पाण्यात पाहतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भविष्यात भाजपशी थेट आणि उघड युती केल्यास त्याचा मोठा राजकीय फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. मुंबई आणि ठाणेसारख्या शहरांमध्ये मराठी माणसाचं राजकरण करणाऱ्या मनसेला आजही मतदार डावलतो आहे आणि उत्तर भारतीयांचा खुलेआम सन्मान जपणाऱ्या शिवसेनेला मतदान करत आहे. त्यामुळे मराठी राजकरण सुरुच ठेऊन, उत्तर भारतीय राजकारण न डगमगता वेगळ्या स्वार्थी मार्गाने करावे असं अनेकांना आजही वाटतं आहे.

सध्या नाशिक, चंद्रपूर, पुणे सारख्या महापालिकांमध्ये मनसेने भाजपशी खुलेआम जवळीक वाढवावी असा मतप्रवाह तयार होतो आहे. राजकारण हे असंच करावं लागतं तरच पक्ष वाढतो हे सध्याच्या राजकरणातून राज ठाकरे आणि मनसेने स्वीकारणं गरजेचं आहे. लोकं आपल्याला आज ना उद्या ओळखतील आणि सत्तेत बसवतील या भीषण स्वप्नात मनसेचे कार्यकर्ते आजही रममाण दिसतात. वास्तविक मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मतदाराला ओळखणं गरजेचं आहे आणि स्थानिक पातळीवर पक्ष हिताचं राजकारण करणं भविष्यासाठी गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवणारे राज ठाकरे पुन्हा त्यांच्या अपेक्षेने जवळीक वाढवतील तर त्यांच्यासाठी घातक ठरेल. कारण आता काँग्रेस आणि राष्ट्र्वादीसोबत उद्धव ठाकरे आहेत आणि ते कधीही राज ठाकरे म्हणजे मनसेला मोठं होण्याची संधी देणार नाहीत हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने केलेल्या सध्याच्या राजकारणामुळे राज ठाकरे यांच्याकडे प्रसार माध्यमांच्यासमोर तत्वांची उत्तर देण्यासाठी भरपूर खाद्य दिलं आहे आणि सध्या राज ठाकरे यांच्या कोणत्याही ऐतिहासिक निर्णयावर नावं ठेवावी याला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तोंडच उरलं नसल्याने मनसे या परिस्थितीचा कसा राजकीय फायदा उचलते ते पाहावं लागणार आहे…….अन्यथा अमीर खान यांच्या गुलाम सिनेमातील तो डायलॉग मारण्याची वेळ येईल….“फिर साला आत्मसन्मान !! साला बॉडी में हड्डी ही नहीं बचेगी तो आत्मसन्मान का आचार डालेगा क्या !!

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x