28 March 2024 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातल्यास आंदोलन करु - खा. नारायण राणे

BJP MP Narayan Rane, Konkani peoples. Ganesh Utsav, Lockdown

मुंबई, १० जुलै : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे, त्यानिमित्ताने अनेकजण गावी जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याअनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वात मुख्य निर्णय म्हणजे इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ असा टोलाही यावेळी राणेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली.

“कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असं नारायण राणे म्हणाले.

 

News English Summary: BJP MP Narayan Rane has warned that if Chakarmanya is banned from going to Konkan during Ganeshotsav, we will agitate. After BJP leader Ashish Shelar, Narayan Rane also demanded that Chakarmanya be allowed to go to Konkan.

News English Title: BJP MP Narayan Rane warns to protest if Konkani people not allowed to visit Konkan during Ganesh Utsav News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x