12 August 2020 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

युवासेना अध्यक्षांची महत्वाकांक्षी 'टॅब' योजने 'अव्यवहार्यतेमुळे' गुंडाळली

मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील ‘टॅब’ वाटप योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. परंतु सखोल अभ्यास न करताच तिची अंमलबजावणी करण्याची घाई अखेर ‘टॅब’ योजना गुंडाळण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच समजतं. सेनेचे नगरसेवक त्यावर उघड पणे बोलणं सुद्धा टाळत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प अव्यवहार्यतेमुळे गुंडाळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘टॅब’ देण्याची योजना आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपूर्वी साकारलेली होती. त्यासाठी विविध पुरवठादार कंपन्यांशी चर्चा सुद्धा सुरु होती. परंतु हि संपूर्ण योजनाच अव्यवहार्य असल्याचे दिसू लागल्याने सर्व बोलणी थंडावली आणि अखेर येत्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन टॅब मिळणार नाहीत हे नक्की झालं.

सदर योजना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील असल्याची आणि ती आधुनिक शिक्षण व्यवस्थेसाठी किती महत्वपूर्ण आहे हे माध्यमांसमोर हिरिरीने जाऊन सांगणारे शिवसेनेचे नेते याच योजनेने गाशा गुंडाळला हे समोर येऊन बोलण्याचे धाडस करताना दिसत नाहीत.

ऑगस्ट २०१५ मध्येच ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यानुसार टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला टॅब पुरवण्याचे काम देण्यात आले. परंतु पहिल्या प्रस्तावालाच उशीर झाला आणि अखेर टॅब डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.

तर दुसऱ्या वर्षी थेट ‘मेड इन चायना’ टॅब आले आणि अखेर तेही टॅब बॅटरीच्या गुणवत्तेमुळे शालेय विद्यार्थ्यांना उशिरा हाती लागले. तर २०१६ मध्ये ९ वीचा अभ्यासक्रमच बदलला ज्यामध्ये अभ्यासक्रम टॅबमध्ये समाविष्ट करण्याची व्यवस्था नसल्याचे उघड झाले. अखेर महापालिकेने त्या कंपनीला दिलेले ३ वर्षांंचे कंत्राट महापालिकेकडून रद्द करण्यात आले आणि नवीन कंपनीला टॅब पुरवण्याचे कंत्राट देण्यासाठी महापालिकेकडून नव्याने निविदा काढण्यात आल्या. पण महापालिकेच्या त्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्याचाच प्रत्यय म्हणजे गेल्या शैक्षणिक वर्षांत टॅब देता आले नाहीत. त्यानंतर सर्वच थंडावल्याचे चित्र आहे. त्याआधी २०१७ मध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दोन वर्षे जुना टॅब देण्यात आला. तसेच ९ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे टॅब ८ वीच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.

मात्र शिवसेनेचे माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी तांत्रिक कारण पुढे केलं आहे. तर आधुनिक तंत्रज्ञान आता ‘टॅब’ वरून आता थेट ‘स्मार्ट चीप’वर आलं आहे. त्यामुळे योजना तर पुढे केली, परंतु त्याचा सर्व बाजूनी किती अभ्यास केला गेला होता हाच मुळात अभ्यासाचा विषय आहे असं विरोधक बोलत आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x