15 December 2024 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? | राऊतांचा सवाल

Shivsena MP Sanjay Raut, Barack Obama, Congress leader Rahul Gandhi

मुंबई, १४ नोव्हेंबर: राहुल गांधी (Rahul Gandhi) घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे आहेत; ज्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु, त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही, असे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (US former President Barack Obama) यांनी राहुल गांधींबद्दल त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे.

बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land Book by Barack Obama) या आत्मचरित्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्याशिवाय सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल देखील लिहिले आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि सुमार योग्यतेचे नेते आहेत, असे ओबामा म्हणाले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’चा आढावा घेतला आहे. यात बराक ओबामा यांनी जगभरातील इतरही राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. एका पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओबामा यांच्या पुस्तकाबद्दल भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ओबामा यांच्या या टिपण्णीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, ओबामा यांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

‘परदेशी राजकारणी भारतातील नेत्यांविषयी अशी मते देऊ शकत नाही. ओबामा यांना या देशाबद्दल किती माहिती आहे? असा रोखठोक सवाल करताच राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं अनि इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारण केलं, ही गोष्टी चुकीची आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

 

News English Summary: Shiv Sena has commented on the remarks made by former US President Barack Obama about former Congress President Rahul Gandhi in his book. Shiv Sena leader Sanjay Raut has commented on Obama’s book in a press conference. Sanjay Raut has expressed displeasure over Obama’s remarks. Also, who gave Obama the right to talk about Indian leaders? Raut has also raised this question.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut talking about Barack Obama over his views on congress leader Rahul Gandhi News updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x