18 April 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

अमेरिकेत कोरोनाचा कहर; तर ट्रम्प निवडणुक रॅलीच्या तयारीला

Corona Crisis, Covid 19, US President Election

वॉशिंग्टन, ३० एप्रिल: अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु आहे, अमेरिकेत बुधवारी २८,००० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारीही सुरु आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील. तर डेमोक्रेटिक पक्षातर्फे जो बिडेन अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. वर्षअखेरीस होणाऱ्या या निवडणुकीची चर्चा जगभरात सुरु आहे.

अमेरिकेत सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. जगभरातले सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. अमेरिकेत बेरोजगारांची संख्या आजवरची सर्वाधिक झाली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिक अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावणार याची उत्सुकता जगभरात आहे. या आठवड्यात करण्यात आलेला ओपिनियन पोल त्यादृष्टीने महत्वाचा आहे.

याच आठवड्यात रॉयटर आणि इपसॉस (Reuters/Ipsos) यांनी केलेल्या ओपिनियन पोलनुसार डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चार टक्के अधिक मतं घेऊन आघाडीवर आहेत. ४४ टक्के मतदारांनी बिडेन यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर ४० टक्के मतदार ट्रम्प यांच्या बाजुने आहेत. मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनिया या महत्वाच्या तीन राज्यांत बिडेन यांना ओपिनियन पोलमध्ये आघाडी मिळाली आहे. तर ट्रम्प यांना २०१६ च्या निवडणुकीत ज्या राज्यांत यश मिळालं तेथे अजूनही पाठिंबा आहे.

अमेरिकेत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे. मात्र, असे असतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरात लवकर लॉकडाउन उठवण्याच्या आपल्या निर्णयावर कायम आहेत. एवढेच नाही, तर आपण पुढच्या आठवड्यापासून निवडणूक प्रचारालाही सुरुवात करणार असल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी स्पष्ट केले. यावरच ते थांबले नाही, तर आपण लवकरच २५००० लोकांना सोबत घेून रॅलीही करणार आहोत, असेही ते म्हणाले.

 

News English Summary: In the United States, 28,000 new corona viruses were found on Wednesday. More than 2,500 people have died from the corona. At the same time, preparations are underway for the presidential election. Incumbent President Donald Trump will once again be the Republican candidate. Joe Biden will be the Democratic presidential candidate. Discussions are underway around the world about this year-end election.

News English Title: Story during corona virus US president Donald trump says will resume travelling for wild us election campaign rallies News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x