13 December 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

न्यूयॉर्कमध्ये नवे पेशंट्स दाखल करण्यासाठी बेड्सही शिल्लक नाहीत; न्यूयॉर्कचे महापौर चिंतेत

Corona Crisis, New York, America, Covid 19

न्यूयॉर्क, २९ मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.

महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेचे देखील कोरोनाने कंबरडे मोडले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो, गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, ३४५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता आहे. कोरोनाने शहरात थैमान घातलं असून दर १७ व्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. सगळी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरून गेली आहेत. नवे पेशंट्स दाखल करून घ्यायला आता बेड्सही शिल्लक राहिले नाहीत. परिस्थिती अशीच राहीली तर हे शहर उद्धवस्त होईल अशी भीती न्यूयॉर्कच्या महापौरांनी व्यक्त केलीय.

 

News English Summary: New York is currently the focus of the world’s attractions. This city, which is the financial capital of the United States, is in great peace right now. Corona reports that one person is dying every 17th minute. All hospitals are flooded with corona patients. Beds are no longer left to file new patients. The mayor of New York has feared that the city would be destroyed if the situation were to continue.

 

News English Title: Story No more beds remain for news Covid 19 Patients in New York city said New Yark city Mayor News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x