28 September 2022 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय न घेण्याचे आदेश Stocks To Buy | बँक किती वार्षिक व्याज देईल?, पण हा शेअर 44 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, नाव नोट करा LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर Mutual Fund Investment | म्युच्युअल फंड SIP मार्फत 1 कोटीचा निधी कसा तयार करता येईल | वाचा सविस्तर Aishwarya Rai Video | मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट?, एअरपोर्टवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या
x

अमेरिका-चीनमधील कोल्ड वॉरपासून दूर राहा...चीनची भारताला धमकी

China, India

वॉशिंग्टन, १ जून: चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारतासोबत सुरु असलेल्या व्यवसायात आणखी चांगले संबंध राखण्याचे आमचे लक्ष असल्याचे देखील चीनने सांगितले आहे.

चीनने भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर कोरोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. चीनच्या सरकारी माडियाने यावर बोलताना, भारत आणि चीनला हा मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची गरज नसल्याचं सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधी केलेल्या ट्विटला चीनकडून अधिकृत उत्तर देण्यात आलेलं नाही. ग्लोबल टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात चीनने म्हटलं आहे की, दोन्ही देशांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीची गरज नाही. भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून मुद्दा सोडवण्यात सक्षम आहे. शांतता बिघडवण्याचं संधी शोधणाऱ्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावधान राहिलं पाहिजे.

 

News English Summary: According to the Global Times in China, China has advised India to stay away from the Cold War between the US and China. It would be better for India to stay away from the ongoing issues between the US and China. China has warned India that any action taken by India against China, along with the US, would have dire economic consequences, along with an epidemic like the Corona.

News English Title: Corona virus Lockdown China Warns India Of Economical Repercussions Over Cold War With America News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x