21 November 2019 7:16 AM
अँप डाउनलोड

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.

मोदी सरकारकडून अमेरिकी उत्पादनांवर लावल्या जाणा-या टॅक्सवरून आणि धोरणांवरून पुन्हा दुसऱ्यांदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या मोदी सरकारला अमेरिकेच्या उत्पादनांवर लावल्या जाणा-या टॅक्सवरून लक्ष करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला ‘टेरिफ किंग’ असं संबोधल आहे. दरम्यान, आम्ही सुद्धा भारतातून येणा-या सर्व उत्पादनांवर तसेच टॅक्स लावू शकतो.

त्यावेळी मोदी सरकारने अमेरिकेबरोबर व्यापार करार करायचं असल्याचं सांगितलं होतं. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठीच मोदी सरकार व्यापार करार करू इच्छितो, असंही अमेरिकेच्या अधिका-यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(40)#Narendra Modi(1044)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या