14 July 2020 6:04 PM
अँप डाउनलोड

एस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा तीव्र विरोध डावलून भारताने रशियासोबत एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टीमसाठी अधिकृत करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दरम्यान, हा करार झाल्यापासून ट्रम्प प्रशासनाकडून भारतावर आर्थिक निर्बंध घालण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच अधिकृत माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली असून नेमके कोणते निर्णय ट्रम्प प्रशासकडून घेतले जातात ते पाहावं लागणार आहे.

रशियासोबत संरक्षण सामुग्रि करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत सूट देण्याचा अधिकार हा केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. भारताने रशियासोबत केलेल्या या कराराबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ” अमेरिकेचा विरोध डावलून रशियासोबत करार करणाऱ्या भारताला CAATSA अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत लवकरच अधिकृत माहिती मिळेल. तुम्ही आता पाहालच, तसेच इराणकडून होणारी तेलखरेदी पूर्णपणे थांबवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ४ नोव्हेंबरच्या डेडलाइननंतरही तेलाची आयात करणाऱ्या देशांना सुद्धा अमेरिका पाहून घेईल, ” असा धमकी वजा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. सध्या इराणकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध घालण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे तरीसुद्धा भारत आणि चीनसारखे मोठे देश सुद्धा इराणकडून अजून तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासन संताप व्यक्त करत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Donald Trump(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x