27 July 2024 7:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार

चेन्नई : देशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर एका मागे एक कसे पळून जात आहेत असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. कारण सुद्धा तसंच आहे, ते म्हणजे स्टेट बँके सहित तब्बल १४ बँकांना ८४२ कोटींचा चुना लावून चेन्नई स्थित कनिष्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भूपेश कुमार जैन आणि त्याची पत्नी मॉरिशसला फरार झाले असल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल १४ बँकांना ८४२ कोटींचा चुना लावला गेला असून त्यात स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेचा सुद्धा समावेश आहे. दुसरं म्हणजे या बँकांनी सीबीआयकडे या घोटाळ्याची माहिती दिली असली तरी अजून पर्यंत या कंपनीचा मालक भूपेश जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन यांच्यावर कोणताही गुन्हा किव्हा एफ.आय.आर दाखल झाला नसल्याचे समजते. या घोटाळ्याच्या रकमेशी जर व्याजाची रक्कम जोडली तर हा घोटाळा जवळजवळ १,००० कोटीच्या घरातला असल्याचे समजते.

भूपेश जैनने घेतलेल्या एकूण ८४२ कोटीच्या कर्जाची परतफेड करणे एप्रिल २०१७ पासून पूर्णपणे थांबवलं होत. जेव्हा बँकेच्या प्रतिनिधींनी स्टॉक ऑडिटसाठी त्याचाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. अखेर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मे २०१७ मध्ये त्याच्या कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयाला, फॅक्ट्री आणि शोरूमला भेट दिली असता त्याला टाळा असल्याचे समोर आले. परंतु त्यांना फॅक्ट्रीत कोणताही स्टॉक मिळाला नाही कारण भूपेश जैनने आधीच सर्व स्टॉक खाली केला होता.

हॅशटॅग्स

#Bhupesh Jain(1)#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x