19 January 2022 12:06 AM
अँप डाउनलोड

कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीची सुषमा स्वराज यांच्याशी भेट.

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानात प्रत्यक्ष भेट घेतल्या नंतर आज त्यांच्या आई आणि पत्नींची भारताच्या परराष्ट्रमंत्री श्रीमती. सुषमा स्वराज यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. त्यांच्या सोबत यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव जयशंकर ही हजार होते.

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काळ त्यांच्या पत्नीची आणि आईची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात एका कार्यालयात काचे आडून इंटरकॉमवर केवळ अर्ध्या तासाची भेट झाली होती, त्यानंतर आज त्यांनी नवी दिल्ली येथे परतल्यावर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x