26 May 2022 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

जाधवांचा पाकिस्तानात छळ, शरीरावर जखमांचे निशाण !

मुंबई : आज केवळ जगाला दाखवण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्याशी त्यांच्या आई आणि पत्नी सोबत भेट पाकिस्तान सरकार ने घडवून आणली. त्यांच्या भेटी दरम्यान काचेची भिंत होती आणि त्यांच्यात फोनवरून संभाषणं झालं. परंतु या भेटी नंतर पाकिस्तानच्या हेतू बद्दलच शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत.

आई आणि पत्नी सोबतच्या भेटी दरम्यान कुलभूषण जाधवांनी निळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. परंतु या भेटी नंतर प्रसिध्द झालेला फोटो मध्ये त्यांच्या शरीरावरील काही भागांवर म्हणजे डोके, गळा आणि उजव्या कानावर जखमा असल्याचं दिसत आहे.

कॉंग्रेस ने हि प्रतिक्रिया दिली असून पक्षातर्फे तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जाधवांच्या डोक्यावर काही जखमांचे निशाण दिसत असून त्यांचा पाकिस्तान मध्ये शारीरिक छळ केला जात असल्याची शंका शशी थरूर यांनी बोलून दाखवली.

दरम्यान भारतातून सर्वच बाजूने पाकिस्तानच्या या ढोंगी पनावर तिखट प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x