27 May 2022 5:52 AM
अँप डाउनलोड

पुण्याचा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी २०१७ किताबाचा मानकरी.

पुणे : यंदाची प्रतिष्ठेची ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्याचा पैलवान अभिजित कटके याने पटकावली. अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर धूळ चारत महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची गदा पटकावली.

परंतु नंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तो म्हणजे किरण भगतचे वस्ताद काका पवार यांनी या लढतीतील पंचांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. पंचांनी किरण भगतच्या कुस्तीला न्याय दिला नाही”, असा आरोप वस्ताद काका पवार यांनी केला.

पुण्याच्या अभिजीतने किरणवर १०-७ असा विजय संपादित केल्यावर भूगावच्या मामासाहेब क्रीडानगरीत प्रेक्षकांचा एकच जल्लोष पहायला मिळाला.

एन.सी.पी चे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सन्माननीय शरद पवार यांच्या हस्ते पुण्याच्या अभिजीतला महाराष्ट्र केसरीची गदा बहाल करण्यात आली.

हॅशटॅग्स

#Maharashtra Kesari 2017(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x