मुंबई : गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला. पुढे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेला असाही सणसणीत टोला लगावला कि ‘शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट ही जप्त झाले आहे; त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचे मशीन विकत घ्यावे लागेल. दुसऱ्याच्या घरी पोरगं झालं तरी हे आनंद साजरा करतात. ज्या काँग्रेसला मतं मिळाली की ज्यांना आनंद होतो त्यांचा अंत काँग्रेसच्याच रस्त्यावर होईल.’ अशी घणाघाती टीका शेलारांनी केली आहे’.
सामना या वृत्तपत्रातून शिवसेनेने गुजरात निवडणुकीवरून मोदी सरकार विविध विषयातून टीका केली. इतकंच न्हवे तर वारंवार काँग्रेस आणि राहुल गांधींची स्तुती ही केली होती.
त्यात अजून भर म्हणजे किरीट सोमैय्यानी सिध्द ट्विट करून उध्दव ठाकरेंन वर बोचरी टीका केली कि ‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना….
आशिष शेलार आणि किरीट सोमैय्या नेहमीच संधी मिळताच शिवसेनेवर आणि उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
