गांधीनगर : गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त. शिवसेनेच्या एकूण उमेदवारांपैकी केवळ ८ उमेदवारांनाच एक हजाराचा आकडा पार करता आला. एकत्र सत्तेत असूनही शिवसेना वेळोवेळी भाजप विरोधी भूमिका घेताना दिसत आहे. इतकंच न्हवे तर गुजरात निवडणुकीत केवळ भाजप ची डोकेदुखी वाढवण्यासाठीच आणि हिंदू मंतांमध्ये फूट पाढण्यासाठी गुजरात विधानसभा निवडणुकीत ३६ जागांवर उमेदवार उभे केले.

परंतु शिवसेनेवर वेगळीच नामुष्की ओढवली आहे कारण शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. एकूण उमेदवारांना मिळून २८,६६० मत मिळाली म्हणजे एकूण मतदानाच्या केवळ ०.०८ टक्के. त्यामुळे शिवसेनेवर भलतीच नामुष्की ओढवली आहे, कारण भाजप चे आमदार आशिष शेलार यांनी निकाला आधीच सांगितले होते कि शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल म्हणून जे निकालावरून स्पष्ट झालं

All Shiv Sena Candidates In Gujarat Polls Lose Election Deposit