15 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health First | साबुदाणा खाण्याचे हे आहेत मोठे आरोग्यदायी फायदे

Sabudana Sago, health benefits, healthy life

मुंबई, १४ डिसेंबर: आषाढी एकादशी अवघ्या ५-६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करतात. उपवास म्हटले की, साबुदाण्याची खिचडी आली. कसाव्हाच्या झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून साबुदाणे तयार केले जातात. भारताप्रमाणेच सर्व जगभर हेच साबुदाणे उपवासासाठी वापरले जातात. पण साबुदाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि त्यामुळे ते खाण्यासाठी विशेष दिवस असण्याची गरज नाही.

प्रोटिन्स मिळवण्यासाठी हा एक उत्तम शाकाहारी पर्याय आहे. साबुदाण्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला प्रोटिन्सचा पुरवठा होऊन स्नायूंची वाढ होऊन ते मजबूत होतात. तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

स्नायू बळकटीसाठी:
साबुदाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असल्याने, मसल्स विकसित होण्यास मदत होते.

ब्लड प्रेशर:
साबुदाण्यामध्ये असणारं पोटेशियम रक्त प्रवाह सुरळित ठेऊन, ते नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. त्याशिवाय साबुदाणा मांसपेशींसाठीही फायदेशीर आहे.

पोटाच्या समस्या:
पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर साबुदाणा खाणं, फायदेशीर असल्याचं मानलं जातं. साबुदाणा पचनक्रिया ठिक करुन, गॅस, अपचन आणि इतर समस्यांमध्ये लाभदायक ठरु शकतो.

शरीरातील हाडांसाठी:
साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि आवश्यक लवचिकतेसाठी फायदेशीर ठरु शकतं. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व ‘व्हिटॅमिन के’ मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते. तसेच यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा कमी होऊन उत्साह वाढण्यास मदत होते.

ऊर्जेची पातळी वाढते:
तुम्हांला दिवसभर काम करून अधिक थकवा जाणवत असल्यास आहारात साबुदाण्याचा समावेश करावा. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तसेच साबुदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्याने हा ऊर्जा मिळवण्याचा जलद आणि आरोग्यदायी मार्ग आहे.

जन्मदोषांपासून संरक्षण होते:
साबुदाण्यामध्ये फोलिक अॅसिड आणि ‘व्हिटॅमिन बी’ असल्याने अर्भकाची योग्य वाढ होते व इतर मज्जासंस्थेसंबंधीच्या दोषांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते:
साबुदाण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि वात यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच साबुदाण्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

 

News English Summary: Many people mainly eat sago during fasting. Sabudana is considered to be a Balance Diet rich in nutrients. It contains many vitamins, proteins, minerals, and carbohydrates.

News English Title: Sabudana Sago health benefits for healthy life news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x