15 December 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | तर भारत आशियातील सर्वात गरीब देश....हा?

Congress leader Bhai Jagtap, Modi government, Poor in Asia, Mukesh Ambani Rich

मुंबई, १४ डिसेंबर: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांची फेसबुक या कंपन्यांमध्ये भागीदारीचा करार झाल्यानंतर अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे. फेसबुकबरोबर झालेल्या व्यवहारामुळे मुकेश यांची संपत्ती ४ अब्ज डॉलरने वाढून ४९ अब्ज डॉलवर पोहोचली आहे.

दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील चार वर्षांमध्ये ही भारताची सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. असं झाल्यास भारत हा दक्षिण आशियामधील तिसरा सर्वात गरीब देश ठरेल. सध्या दक्षिण आशियातील गरीब देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्या वर असतील. बांग्लादेशबरोबरच भूतान, श्रीलंका आणि मालदीवही जीडीपीच्या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी करतील असं सांगितलं जात आहे.

त्यालाच अनुसरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. याबाबत मोजक्या शब्दात ट्विट करताना भाई जगताप यांनी म्हटलं आहे की, “अंबानी एशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर भारत आशियातील सर्वात गरीब देश बनला आहे…हा संयोग नाही प्रयोग आहे !!”

 

News English Summary: Ambani has once again become the richest man in Asia after Mukesh Ambani’s Reliance Jio and Mark Zuckerberg signed a partnership agreement on Facebook. He has overtaken Alibaba founder Jack Ma. Mukesh’s fortune has increased by 4 billion to 49 billion due to his dealings with Facebook.

News English Title: Congress leader Bhai Jagtap criticized Modi government over poor condition of Indian in Asia news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x