Health First | पेरूच्या पानांचे गुणकारी उपयोग | हे आजार मुळापासून गायब होतात
मुंबई, ३ सप्टेंबर : जेव्हा फळांचा विषय निघतो, तेव्हा सफरचंद, डाळिंब, आंबा आणि द्राक्ष याबद्दल सर्वच बोलतात, परंतु, पेरूसारख्या गुणकारी फळाचा कोणीच उल्लेख करीत नाही. पेरु भारतात सहज मिळणारे फळ आहे. पेरूचे गुणधर्म खूप आहेत, पण त्याच्या पानांचे पण अनेक उपयोग आहेत, जे कितीतरी लोकांना माहीत नाहीत. आज आम्ही त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
पेरु अनेक प्रकारचे असतात. जसे की, अलाहाबादी पेरु, लाल गर असणारा पेरु, चित्तीदार पेरु. पेरुला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत जसे, इंग्रजी मध्ये गुआवा, बंगालीमध्ये पेयारा व मराठीमध्ये पेरू. आता जाणून घ्या, पेरू आणि त्याच्या पानांचे अनेक फायदे.
पेरु हे फळ तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तसेच ह्या फळाचा आस्वादही आपण बरेच वेळा घेतला असेल. देशभरात कोठेही मिळणारे हे फळ आणि याची पानेही तितकीच उपयोगी आहेत. खरे तर, पेरुमध्ये आर्यन भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीरसाठी अतिशय आवश्यक आहे. आर्यनमुळे आपले शरीर लवकर थकत नाही व ऊर्जा टिकून राहते. पेरुच्या पानांचा उपयोग अनेक आजारांमध्ये केला जातो.
पेरूचे वैज्ञानिक नाव सिडियम गुआवा असे आहे. कितीतरी लोकांचे असे म्हणणे आहे, की पेरु कधीही फोडी करून खाऊ नये. जर कोणी एखादी व्यक्ति पेरु खात असेल, तर त्याला तो पूर्ण खाऊ द्यावा. असे मानले जाते, की पूर्ण पेरुमध्ये असे एक बीज आहे, जे “रोगप्रतिकारक शक्ति” वाढवते, तसेच, सर्दी व खोकला यापासून आपला बचाव करते. तसे पहिले तर, पेरुने रोगप्रतिकारक शक्ति वाढते हे बरोबर आहे, पण “पेरुच्या बी”च्याबद्दल कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
दातांसाठी उपयोगी:
जर तुमचे दात दुखत असतील, किंवा दात कमजोर असतील व हिरड्यातून दुर्गंधी येत असेल, दातातून पू येत असेल, व रक्त येत असेल, तर या अशा अनेक विकारांवर पेरुच्या पानांची पेस्ट अतिशय उपयोगी आहे. जर तुम्हाला तुमच्या दातांच्या अनेक समस्या सोडवायच्या असतील, तर तुम्ही पेरुच्या पानांची पेस्ट दातावर रोज टुथपेस्ट प्रमाणे लावून दात स्वछ घासावेत. तर तुमच्या दातांच्या समस्या लवकरच संपुष्टात येतील.
गाठी येणे:
पेरूची पाने ही शरीरावरील गाठीनसाठी पण अतिशय उपयोगी आहेत. पेरूची पाने कुटून त्याचा लगदा बनवून तो किंचित गरम करून, जिथे गाठ आली आहे, तिथे लावावा म्हणजे सूज कमी होते व आराम पडतो. या आजारात आहे पेरु अतिशय फायदेशीर: हृदयासाठी पेरुच्या पानांचा रस प्यायल्याने आपले हृदय स्वछ होते. याशिवाय पोटाच्या अनेक आजारामध्ये पेरुच्या पानांचा उपयोग होतो.
News English Summary: Their fruits are oval in shape with light green or yellow skin and contain edible seeds. What’s more, guava leaves are used as an herbal tea and the leaf extract as a supplement. Guava fruits are amazingly rich in antioxidants, vitamin C, potassium, and fiber. This remarkable nutrient content gives them many health benefits. Here are 8 evidence-based health benefits of guava fruits and leaves.
News English Title: Healthy Benefits of Guava Fruit and Leaves Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट