27 April 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

जनतेचा प्रतिसाद पाहून शिंदे गटातील मंत्री सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेला घाबरल्याची चर्चा, जळगावात सभेला परवानगी नाकारली

Sushma Andhare

Sushma Andhare | शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा रद्द झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांची सभा औरंगाबाद जिल्ह्यात होणार होती. तर सुषमा अंधारे यांची सभा ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे होती. या दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. मुक्ताई नगरमध्ये आज संध्याकाळी ६ वाजता सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र प्रशासनाने सभेची परवानगी नाकारली आहे. मुक्ताई नगर या ठिकाणचं स्टेजही काढून टाकण्यात आलं.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारेंची सभा होती. तर याचठिकाणी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही सभा रद्द करत असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पोलिसांनी हॉटेलच्या खाली आल्यावर अडवलं
मला पोलिसांनी सभा स्थळी जाण्यापासून इथे हॉटेलच्या खाली आल्यावरच अडवलं आहे. मी आत्ता कारमध्ये बसून राहिले आहे. माझ्यासमोर किमान पाचशे पोलिसांचा फौजफाटा आहे. मला का थांबवण्यात येतं आहे? हे अजून समजलेलं नाही. सभा घेणं हा माझा अधिकार आहे मी काही दहशतवादी आहे का? की मला अशा प्रकारे अडवलं जातं आहे? गुलाबराव पाटील हे सत्ता असल्याने अशा प्रकारे अडवणूक आणि दडपशाही करत आहेत हे सहन केलं जाणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
यावेळी सुषमा अंधारे यांच्यासोबत आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धवसाहेब अंगार है बाकी सब भंगार है अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. तसंच सुषमा अंधारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशाही घोषणा दिल्या गेल्या. सुषमा अंधारे यांच्या दोन दिवसात जळगावमध्ये ज्या सभा झाल्या त्या पाहून आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मिंधे गटाच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळेच ही दडपशाही केली जाते आहे असं सुषमा अंधारे यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sushma Andhare criticize DCM Devendra Fadnavis know the reason check details 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Sushma Andhare(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x