25 June 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

भाजपची पोलखोल | कांजूरमार्गच्या जागेसाठी फडणवीस सरकारनेच केंद्राकडे प्रस्ताव दिलेला

Mumbai Kanjurmarg, Metro 3 car shed, Devendra Fadnavis, Sachin Sawant

मुंबई, ६ नोव्हेंबर: आरेतील जंगल वाचविण्यासाठी आणि मुंबई शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत प्रकल्प मुंबईतील कांजूरमार्गच्या जागेवर हलवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळालं होतं. धक्कादायक म्हणजे काही दिवसातच कांजूरच्या जागेवर थेट केंद्राने मालकीचा दावा ठोकला आणि वाद चिघळणार याचे संकेत मिळू लागले. विशेष म्हणजे केंद्र सरकार यामध्ये अडथळे आणत असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत आधीच गेला आहे.

मात्र आता महाविकास आघाडीतील नेत्याकडून तत्कालीन फडणवीस सरकारची पोलखोल करण्यास सुरुवात झाली आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडूनच केंद्र सरकारकडे मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी हीच जागा सर्वात उपयुक्त असल्याचा दावा त्यांच्या पत्रातून देखील लेखी स्वरूपात करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीच्या महत्वाच्या निर्णयानंतर म्हणजे आताच ही जागा उपयुक्त कशी नाही, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

दरम्यान, आरेतील जंगल तोडीला लोकांचा तीव्र विरोध होत असल्याने मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर जंगल वाचविण्यासाठी आणि लोकांचा विरोध लक्षात घेत आरे येथील कारशेड दुसरीकडे हलविण्याचा धाडसी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार कांजूरमार्ग येथे ही कारशेड बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने या जागेवर दावा केल्याने हा कारशेड प्रकल्प वादात सापडला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र दोन्ही बाजूचा विचार करता वाद अजून चिघळण्याची अधिक चिन्ह आहेत.

 

News English Summary: The proposal for the Kanjurmarg Metro car shed in Mumbai was sent to the Center by the Devendra Fadnavis government of the Bharatiya Janata Party. What is special is that this place was the most useful place at that time. However, after the important decision of the Mahavikas Aghadi, how can this place not be useful now, a direct question has been raised by the Congress spokesperson Sachin Sawant in a press conference.

News English Title: Mumbai Kanjurmarg Metro 3 car shed former CM Devendra Fadnavis approach Union government News Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x