14 December 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

जॉर्जियात बायडेन यांना आघाडी | डोनाल्ड ट्रम्प समर्थकांची चिंता वाढली

US Presidential Election 2020, Joe Biden, Donald Trump, Georgia Pennsylvania

वॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजून देखील संपलेली नसून मतमोजणी सुरूच आहे. अजून देखील काही महत्वाच्या राज्यात मतमोजणी सुरु आहे. महत्वाचं म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या दरम्यान अत्यंत कमी फरकाने झुंज दिसत असली तरी आता जो बायडेन यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

यूएसमधील नेवाडा, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये अजून मतमोजणी सुरु आहे. त्यात महत्वपूर्ण असलेल्या जॉर्जियामध्ये जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कमी प्रमाणात का होईना पण अत्यंत महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. तिथे बायडेन एकूण ९०० पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतल्याचं वृत्त आहे असं सीएनएनने वृत्त दिले आहे.

तर दुसरीकडे पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात अत्यंत अटीतटीची आणि उत्कंठा वाढविणारी टक्कर मतमोजणीत दिसत आहे. एपीच्या अंदाजानुसार तिथे देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे मताधिक्य १८,०४२ पर्यंत घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जर जो बायडेन यांनी जॉर्जियात बाजी मारली तर १९९२ नंतर जॉर्जिया जिंकणारे ते पहिले डेमोक्रॅट उमेदवार ठरतील. पेनसिल्व्हेनियामध्ये अजून तब्बल २ लाख मतांची मोजणी शिल्लक आहे. तिथे बायडेन फक्त १८ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचं वृत्त आहे.

 

News English Summary: Incumbent President Donald Trump and Democratic nominee Joe Biden seem to be at odds, but now Joe Biden is leading. Counting is still underway in Nevada, Pennsylvania, Georgia and North Carolina in the US. In Georgia, which is important in that, Joe Biden has taken a very important lead over Trump. According to CNN, Biden is leading with more than 900 votes.

News English Title: US Presidential Election 2020 Joe Biden Takes Lead On Trump In Georgia Reach Close To Pennsylvania News updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x