3 June 2020 6:06 AM
अँप डाउनलोड

कोरोना व्हायरसचे अजून एक गंभीर लक्षण समोर; डब्ल्यूएचओ'ने दिली माहिती

WHO, World Health Organization, Corona Virus

जिनिव्हा, १७ मे – जगभरात ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान २, ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगाला कोरोना विषाणूच्या नवीन लक्षणांबद्दल इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी सांगितले की, बोलण्यात येत असलेली अडचण म्हणजे कोरोना व्हायरसचे एक गंभीर लक्षण आहे. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर केवळ खोकला किंवा ताप ही कोरोना विषाणूची दोन मुख्य लक्षणे आहेत असं सांगत होते.

डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, कोरोना विषाणूमुळे ग्रस्त बहुतेक लोकांना श्वासोच्छवासाची हलकी समस्या असू शकते आणि विशिष्ट उपचारांशिवाय ते बरे होतील. कोरोना विषाणूच्या गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे येणे, बोलणे किंवा चालण्यात अडचण येणे हीदेखील कोरोना विषाणूची गंभीर लक्षणे समाविष्ट आहेत. त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यापूर्वी एकदा हेल्पलाइनचा सल्ला घ्यावा. बोलण्यात अडचण नेहमीच कोरोना विषाणूचे लक्षण नसते. कधीकधी इतर कारणांमुळे बोलण्यास त्रास येतो असं देखील स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The World Health Organization (WHO) has warned the world about new symptoms of the corona virus. According to WHO experts, the difficulty in speaking is a serious symptom of the corona virus. Until now, doctors around the world have been saying that only cough or fever are the two main symptoms of the corona virus.

News English Summary: Difficulty In Speaking Could Be New Serious Symptom Of Corona virus say WHO News Latest Updates.

 

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(756)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x