13 July 2020 12:56 PM
अँप डाउनलोड

शहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय

Corona virus, Covid 19

मुंबई, १७ मे: लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान २, ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

चिंतेचीबाब म्हणजे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी एकूण करोनाबाधितांच्या संख्येत भारताने चीनला मागे टाकले होते. शनिवारी, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९० हजार ६४८ झाली आहे. मागील आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.

देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण करोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील करोनाग्रस्तांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार ८७१ इतकी असून, ३४ हजार २२४ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

राज्यातील कोकणासारखा ग्रीनझोनमध्ये सुद्धा झपाट्याने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यांमध्ये सुद्धा कोरोना मोठ्याप्रमाणावर पसरू लागल्याने आधीच शहरांमध्ये आरोग्य सेवेचे तीनतेरा आणि क्षमता संपल्यात जमा असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात पावसाच्या तोंडावर रुग्णसंख्या वाढणं हि अत्यंत चिंतेची बाब म्हणावी लागेल.

 

News English Summary: Even in green zones like Konkan in the state, the number of patients is increasing rapidly. With the spread of corona on a large scale even in rural areas of Maharashtra, while the health services in the cities are already depleted and the capacity is depleted, on the other hand, the increase in the number of patients in rural areas due to rains is a matter of great concern.

News English Title: Corona virus India Covid 19 Cases Surpass 90000 Death Toll At 2871 News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1011)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x