14 July 2020 7:11 PM
अँप डाउनलोड

संतापजनक पोस्ट: तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर किमान त्याचा आनंद घ्या

Kerala MP, Enjoy Rape, Anna Linda Eden, Hibi Eden

तिरुवनंतपूरम: ‘नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या’, हे वाक्य कोणा गुन्हागार अथवा बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाही तर एका लोकप्रतिनिधीच्या पत्नीचे आहे. केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांच्या पत्नीने फेसबुकवर बलात्कारासारख्या घटनेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यांनी नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

घराबाहेर असलेल्या पूरस्थितीवरुन मस्करी करण्याचा अन्ना एडन यांचा प्रयत्न होता. पण तो त्यांच्यावर उलटला. समाज माध्यमांवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोमवारी ही पोस्ट टाकली होती. लोकांचा संताप पाहून मंगळवारी ही पोस्ट डिलीट केली. अन्ना एडन यांनी नंतर दुसऱ्या फेसबुक पोस्टमधून माफी मागितली.

ज्या महिला या परिस्थितीतून गेल्या आहेत त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी जे शब्द वापरले त्याबद्दल सुद्धा माफी मागते असे अन्ना एडनने आपल्या माफीनाम्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१३ साली माजी सीबीआय संचालक रणजीत सिन्हा यांनी सुद्धा असेच वक्तव्य केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर आनंद घ्या असे त्यांनी म्हटले होते.

अन्ना यांनी फेसबुक पोस्टवर लिहले होते की, ‘नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या’. या पोस्टनंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्यामुळे त्यांनी संबंधित पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली. अन्ना यांनी ही पोस्ट शेअर करताना दोन छोटे व्हिडिओ देखील शेअर केले होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Congress(381)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x