14 July 2020 6:23 PM
अँप डाउनलोड

मीडिया तुम्हाला माझ्याविरुद्ध बोलायला भाग पाडेल; मोदींचा सावध राहण्याचा इशारा

PM Narendra Modi, Nobel Award Winner abhijit banerjee

नवी दिल्ली: ‘पंतप्रधान मोदी यांनी मला मीडियापासून सावध राहण्यास सांगितलंय. मीडिया तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल,’ असं त्यांनी हसत-हसत सांगितल्याची माहिती नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज दिली.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अर्थशास्त्रातील २०१९ च्या नोबेलचे मानकरी ठरलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. बॅनर्जी यांच्या कार्याचा देशाला अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,’ असं ट्विट मोदींनी या भेटीनंतर केलं होतं. बॅनर्जी यांनीही या भेटीविषयी पत्रकारांशी संवाद साधला.

काँग्रेसला २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी अभिजीत बनर्जी यांनी मदत केली होती. म्हणून जागतिक गरिबी या विषयावर संशोधन केल्यामुळे बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सध्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे म्हटल्यामुळे अभिजीत बॅनर्जी यांच्या भाजपाच्या नेत्यांनी टीका केली होती. ‘बॅनर्जी यांचे विधान चुकीचे आहे. ते डाव्या विचारसरणीचे आहे. त्यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचे कौतुक केले होते. पण हिच योजना अपयश ठरली आहे’, असं म्हणतं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बॅनर्जी यांच्या टीका केली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1246)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x