13 December 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

मोदींच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्री १०वी - १२वी शिकलेले; आता IAS-IPS अधिकारी सलाम ठोकणार

Narendra Modi

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

त्यातील एकूण १६ जणांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने दिली आहे. तर ८ मंत्र्यांनी १०वी ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेतलं असून ४७ मंत्री हे पदवीधर आहेत. शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २४ कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास १४.७२ कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह ४ मंत्र्याकडे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती २१७ कोटी रुपये आहे. ५६ मंत्र्यापैकी २२ मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x