20 April 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

१२८ जागांवरील कल NDA'च्या बाजूने | संपूर्ण निकालासाठी रात्री पर्यंत

Bihar Assembly Election 2020, vote counting

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणूक निकाल (Bihar Assembly Election 2020 Vote counting) प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.

तर दुसरीकडे महाआघाडीने एकूण १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी ६७ जागांवर राष्ट्रीय जनता दल, २० जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुजन समाज पार्टीला दोन जागांवर, MIM’ला दोन जागांवर तर एलजेपी आणि इतर यांना चार जागांवर आघाडी मिळाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार आत्ता तरी एनडीएला आघाडी मिळते आहे असंच दिसतं आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल हाती येण्यासाठी आजची रात्र उजाडणार आहे. निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल अशी माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाकडून बिहारमधील मतमोजणीसंबंधी अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली आली.

त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार हे स्पष्ट झालं आहे. EVM’च्या संख्येत ६३ टक्के वाढ झाली असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. बिहारमध्ये ३ टप्प्यात ४ कोटी १६ लाख लोकांनी मतदान केलं असून दुपारी तीन वाजेपर्यंत एक कोटी मतमोजणी झाली असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

 

News English Summary: The final results of the Assembly elections in Bihar will be announced tonight. The Election Commission has informed that the counting of votes will start till late night. Official information about the counting of votes in Bihar was given to the media by the Election Commission. Therefore, it has become clear that the counting of votes for the Bihar Assembly elections will take longer than usual. With a 63 per cent increase in the number of EVMs, counting will continue till late at night

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote counting will continue till night news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x