21 March 2025 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Lower Berth Ticket l ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी, ट्रेनच्या प्रवासात लोअर बर्थबाबत निर्णय, अधिक अपडेट जाणून घ्या Post Office Scheme l पगारदारांनो पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा, दर महिन्याला ₹9250 व्याज मिळेल Horoscope Today | 21 मार्च 2025; तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल, शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 21 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | 71रुपये टार्गेट प्राईस, सुझलॉन शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करा शेअर, भक्कम कंपनी फंडामेंटल्स, संयम मोठा परतावा देईल - NSE: VEDL Rattan Power Share Price | 530 टक्के परतावा देणारा 10 रुपयाचा शेअर, होतेय रोज खरेदी - NSE: RTNPOWER
x

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८; टेनिसपटू अंकिता रैनाने टेनिस महिला एकेरीत कांस्यपदक

जकार्ता : सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा चांगली झाली आहे. टेनिसपटू अंकिता रैनाने टेनिस महिला एकेरीत कांस्यपदक पटकावलं आहे.

त्यामुळे भारताच्या खात्यातील अजून पदकांमध्ये अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या झ्यांग शुईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शुईने अंकितावर ४-६, ७-६ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

तर दुसरीकडे टेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण ही जोडी अंतिम फेरीत पोहचली आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत बोपण्णा-शरण जोडीने जपानच्या प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ६-३, १०-८ अशी मात केली. या विजयामुळे भारताच्या खात्यात किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या