14 November 2019 1:03 PM
अँप डाउनलोड

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके'चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं निधन

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके’चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं आज चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झालं. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी अधिकृत पत्रक काढून प्रसार माध्यमांना तशी माहिती दिली आहे.

चेन्नईमधील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर २८ जुलैपासून उपचार सुरु होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून १० मिनीटाला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुत्यूच्या बातमीने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे आणि सरकारने एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला आहे.

तामिळनाडूच पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तामिळनाडू तसेच दिल्लीच्या राजकारणातील ते मोठं नाव मानलं जात. चित्रपट श्रुष्टी ते राजकारण असा त्यांचा जीवन प्रवास राहिला आहे.

हॅशटॅग्स

#Tamil Nadu(5)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या