20 September 2021 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
x

तळीये आपत्ती | या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती, असं काही घडेल असं वाटलं नव्हतं - नारायण राणे

Konkan rain

महाड, २५ जुलै | तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली. नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात, अनेकांचा मृत्यू झालेला आहे. ४४ मृतदेह आढळून आले आहेत आणि उर्वरीत मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. अधिकाऱ्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे.”

या गावातच आपलं पुनर्वसन व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरती वसाहत तयार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोक सांगतील तिथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राकडूनही स्थानिकांना मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्व घटनेची माहिती दिली जाईल. नुकसानीचं स्वरुप सांगितलं जाईल. त्यांनीही मला या भागाची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोकणात वारंवार पूरस्थिती होती. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. डोंगराची माती खाली येईल किंवा डोंगराचा कडा कोसळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्यामुळे या घटनेवरून कुणावर आरोप करणं योग्य नाही. आज या दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Minister Narayan Rane visited Mahad Taliye village news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Narayan Rane(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x