मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला आहे.

आमदार राम कदम यांचा लोकप्रनिधी या नात्याने केवळ क्रमांक खालून पहिला आला नसून, तर २०१७ च्या तुलनेत त्यांची कामगिरी या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये अजूनच ढासळली आहे. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्ट नुसार भाजप आमदार राम कदम यांची २०१७ मध्ये गुणसंख्या होती ४१.९६ टक्के म्हणजे ५० टक्के सुद्धा नाही. परंतु असे असताना सुद्धा ती गुणसंख्या २०१८ या वर्षासाठी अजून खालावाली असून ती केवळ ३३.३७ टक्के इतकी झाली आहे. यावरून ते त्यांच्या मतदार संघात जितका देखावा करतात त्यापेक्षा हा रिपोर्ट काही वेगळंच निर्देशित करत आहे.

त्यामुळेच घाटकोपर मधील मतदाराला आमदार राम कदमांबद्दलचे वास्तव निदर्शनास आणून देण्यासाठी घाटकोपर पश्चिम मनसेचे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी एक उपहासात्मक पोश्टर लावलं आहे, ज्याची चर्चा घाटकोपरमध्ये रंगली आहे. त्या पोश्टर’वर असा मजकूर लिहिण्यात आला आहे की,’पप्पू कान्ट डान्स साला ! गोविंदा आला रे आला ! पप्पू पुन्हा नापास झाला……जगातल्या सर्वात मोठ्या नकली भंपक गोष्टी करणारे, नको ती स्वयंम घोषित विशेषण लावणारे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्यांसाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीच्या सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात पुन्हा वर्षीही खालून प्रथम क्रमांक पटकवला या बद्दल त्यांचे अभिनंदन….प्रजा फाउंडेशनने केलेल्या प्रामाणिक आणि खऱ्या सर्वेक्षणाबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन !! असा मजकूर टाकून आमदार राम कदम यांची खिल्ली उडविली आहे.

MNS party criticised bjp mla ram kadam over praja foundation report card on Mumbai MLAs