13 November 2019 11:59 PM
अँप डाउनलोड

अखेर पोर्टेबल पेट्रोल पंपाला पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली : अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय आज मार्गी लागला आहे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोलियम मंत्रालयाची मंजुरी घेऊन सुद्धा त्यासाठी अनेक वर्ष – महिने वाट पाहावी लागते. परंतु आता पेट्रोलियम मंत्रालयाची पोर्टेबल पेट्रोल पंपाच्या तंत्रज्ञानाला मंजुरी दिल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे.

केंद्राच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता आधुनिक पोर्टेबल पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोर्टेबल पेट्रोल पंप अवघ्या २ तासांत उभारण्यात येऊ शकते आणि २ तासांत कुठेही हलविता येऊ शकते. हा पोर्टेबल पेट्रोल पंप डोंगराळ किंवा उंच वा सखल भागातही उभारला जाऊ शकतो. परंतु असे आधुनिक पेट्रोल पंप उभारण्यासाठी किमान ९० लाख रूपये इतका खर्च येणार आहे.

पोर्टेबल पेट्रोल पंप बनविणाऱ्या एलिंग्ज ग्रुपने काल यासंबंधी एक अधिकृत घोषणा केली आहे. पोर्टेबल पेट्रोल पंपाचे ३ मॉडेल असतील. त्यात पहिल्या मॉडेलसाठी ९० लाख, दुसऱ्या मॉडेलसाठी १ कोटी तर तिसऱ्या मॉडेलसाठी १.२ कोटी रूपये खर्च येऊ शकतो. पोर्टेबल पेट्रोल पंपातून डिझेल, गॅस, नैसर्गिक वायू उपलब्ध होणार आहे. या पंपाची क्षमता ९,००० ते ३५,००० लिटर आहे. गेल्या आठ वर्षापासून या पोर्टेबल पेट्रोल पंपाच्या तंत्रज्ञानावर काम सुरु होते. सर्वात आधी यूपीमध्ये २००० ठिकाणी पोर्टेबल पेट्रोल पंप उभारण्याची योजना असेल.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या