14 January 2025 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका
x

मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले ? : राज ठाकरे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील जैन समाजातील मंडळींची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित जैन समाजातील लोकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, पण शेवटी काय झाले, मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना, असा प्रश्न उपस्थित जैन समाजातील लोकांपुढे करून मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

तसेच धर्म आणि जात या विषयावर भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे सांगितलं की, ‘मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही, मला प्रत्येक जात आवडते’, देशात जातीय तेढ वाढली असून मी लहान असताना माझे वर्गमित्र विविध जातीतील होते. पण त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या जातीचा कधीही विचार आला नव्हता. मला सर्व जाती आवडतात, कारण प्रत्येक जातीतील जेवण चांगल असते, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तसेच जैन मुनींनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार का करावा? तुम्ही मुनी आहात मग पक्षाचा प्रचार का करता? याचा जाब जैन समाजानेच विचारला पाहिजे.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत ‘केम छो’ असे म्हणत केले होते. तुम्हाला ते आवडलेही असेल, पण मला ते आवडले नाही. भारताच्या पंतप्रधानांवर कोणत्याही राज्याचा शिक्का नसावा. त्यांच्यावर देशाचाच शिक्का असायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मनमोहन सिंग यांचे स्वागत कधी पंजाबी भाषेत केले आहे का?, अमेरिकेचे लोक हुशार आहेत. एखाद्या व्यक्तीसमोर काय बोलावे म्हणजे तो खूश होईल हे त्यांना माहित आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. उपस्थितांसमोर राज ठाकरे यांनी कोणतही जातीपातीच राजकारण न करता रोख ठोक भूमिका मांडत आणि देशातील सत्य परिस्थितीवर बोट ठेऊन जैन समाजाची काणघडणी केल्याचे दिसत होते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x