नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. काल दिल्लीतील एका इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील आणीबाणीच्या काळात कुलदीप नय्यर यांनी तुरंगवास सुद्धा भोगला होता.

उर्दू प्रेस रिपोर्टर म्हणून त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पुढे ते ‘द स्टेट्समन’चे मुख्य संपादक झाले होते. वयाची तब्बल २५ वर्ष त्यांनी ‘द टाइम्स’ या लंडनस्थित वृत्तपत्राचे प्रतिनिधित्व केलं होत. तसेच डेक्कन हेरॉल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, द एक्सप्रेस ट्रिब्यून पाकिस्तान आणि द डॉन अशा अनेक नामांकित वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले आहे.

पत्रकारितेसोबतच त्यांचा सामाजिक कार्यात सुद्धा मोठा सहभाग असायचा. ‘बिटवीन द लाईन्स’, ‘डिस्टेंट नेव्हर: ए टेल ऑफ द सब कॉन्टिनेन्ट’, ‘इंडिया आफ्टर नेहरू’, इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप’, ‘इंडिया हाऊस’, ‘स्कुप’ आणि द डे लुक्स ओल्ड अशी एक न अनेक पुस्तके कुलदीप नय्यर यांनी लिहिली असल्याने त्यांचा दांडगा अनुभव सुद्धा नजरेस येतो.

Senior journalist kuldeep nayyar Passes Away