24 January 2025 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC
x

केरळच्या पूरग्रस्तांसाठी मनसेच्या अनेक शाखांमधून लोकसहभागातून मदत रवाना

मुंबई : केरळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.

केरळातील महापुरात लाखो संसार उध्वस्त झाले असून आता उसंत घेतलेल्या पावसामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. देशभरातून, अनेक राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा मदतीचा ओघ सुरु असताना अनेक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर सुद्धा केरळला मदत पाठविण्यात येत आहे.

त्या मदतीचाच भाग म्हणून मनसेच्या अनेक शाखांनी लोक सहभागातून निधी तसेच अत्यावश्यक गोष्टी जमा करून त्या केरळच्या दिशेने रवाना केल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या या मदतीची स्थानिक जनतेने सुद्धा स्तुती केली आहे आणि त्यांना भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला आहे. त्यानंतर लोक सहभागातून जमा करण्यात आलेली सर्व मदत केरळच्या पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x