19 March 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Numerology Horoscope | 19 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 19 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Green Share Price | अदानी एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, मिळेल 50 टक्के परतावा, खरेदी करणार? Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा Senior Citizen Saving Scheme | खुशखबर! SBI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना सुरु केली, असा घ्या फायदा
x

Parambir Singh’s Huge Property in Nashik | परमबीर सिंग यांची सह आरोपींच्या नावाने सिन्नरमध्ये जमीन खरेदी?

Parambir Singh’s Huge Property in Nashik

नाशिक, 12 ऑक्टोबर | शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भोवतीचा संशय वाढत चालला आहे. ते पोलिसांसमोर आणि न्यायालयासमोर चौकशी तपासासाठी (Parambir Singh’s Huge Property in Nashik) हजर राहत नाहीत.

Parambir Singh’s Huge Property in Nashik. Mumbai Police has detained Sanjay Punumia, a close aide of Parambir Singh, in connection with the purchase of land worth crores on the basis of forged papers near Sinnar in Nashik district. A person named Aggarwal has lodged a complaint at Sinnar police station :

आता तर त्यांचे नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यातल्या जमीन खरेदीचे हे एक प्रकरण समोर आले आहे एका प्रकरणातील परमबीर यांचे सह आरोपी पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमवीर सिंगनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे. नाशकात ही मालमत्ता असून ती संजय पुनुमिया याच्या नावाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पुनुमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असून त्याचे परमबीर सिंह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे याआधीच उघड झाले आहे. पुनुमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली आहे. धारणगाव, मिरगाव, पाथरे या गावांमध्ये त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे समजते. ही जमीन पुनुमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्यामुळे पुनुमियाला हे सर्व करणे शक्य झाले. विशेष म्हणजे पुनुमिया पिता-पुत्रांच्या नावाचा वापर करून परमबीरब सिंहांनीच ही जमीन खरेदी केल्याची चर्चा सुरू आहे.

या साऱ्या प्रकरणाची तक्रार आता सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कोठडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. परमवीर सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही त्यांना वारंवार समन्स पाठवून देखील ते चौकशीला आणि तपासाला हजर राहिलेले नाही न्यायालयात देखील ते हजर राहत नाहीत. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या सर्व प्रकरणात भोवतीचा संशय वाढत चालला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh’s Huge Property in Nashik Fake land deal close Sanjay Punumiya will bust.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x