19 October 2021 7:19 AM
अँप डाउनलोड

मागील ४ वर्ष विकास कामे ठप्प, भाजप आमदार आर. टी. देशमुखांना एनसीपी कार्यकर्त्यांकडून चोप

बीड : बीडचे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना एनसीपी कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला. भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना अक्षरशः गाडीतून बाहेर खेचून मारहाण करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राजेवाडी येथून एक कार्यक्रम आटपून आमदार आर. टी. देशमुख परतत असताना त्यांना माजलगाव मधील विकास कामासंबंधित प्रश्न एनसीपी कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आले. आमदार आर. टी. देशमुख यांनी मागील चार वर्ष कोणतीही विकास कामे केली नाहीत याचा राग मनात ठेऊन एनसीपी कार्यकर्त्यांकडून देशमुखांना चोप देण्यात आला.

देशमुखांना अक्षरशः गाडीतून बाहेर खेचून मारहाण तर करण्यात आलीच. परंतु त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील चोप देण्यात आला आणि त्यांचा मोबाइल सुद्धा हल्लेखोरांनी फोडून टाकला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करत पोलिसांनी देशमुखांना पोलिसांच्याच वॅन मधून तसेच पोलीस संरक्षणात त्या ठिकाणावरून रवाना केले. सध्या माजलगाव’मध्ये तणावाचं वातावरण आहे.

हॅशटॅग्स

#NCP(371)#Sharad Pawar(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x