26 May 2022 7:35 PM
अँप डाउनलोड

निवडणूक आयोगाने तंबी दिली तरी भाजपकडून प्रचारात लष्कराच्या जवानांच्या फोटोंचा वापर

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharat Pandya

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकित निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते. तरी देखील भाजपच्या पोस्टरवर भारतीय लष्कराच्या जवानांचे फोटो बिनधास्त वापरले जात आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना पत्र पाठवून निवडणुकीमध्ये लष्करी अधिकारी किंवा जवानांचा फोटो वापरू नका असे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय अथवा कोणत्याही स्थानिक पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारातील साहित्यात न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने शनिवारी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

भारतीय वायु सेनेने केलेले सर्जिकल स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टरवर केल्याचे समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x