12 August 2020 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदी-शहा म्हणजे सत्तेच्या लालसेने झपाटून उठलेले गुंड: वाजपेयींच्या पुतणी करुणा शुक्ला

Narendra Modi, Amit Shah

रायपूर : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणीने नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपाची विचारसरणीच बदलून टाकल्याचा आरोप करुणा शुक्ला यांनी केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे गुंड असल्याचा घणाघात करुणा शुक्ला यांनी केला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

बाराबंकी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना करुणा शुक्ला यांनी मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केली. करुणा शुक्ला यांनी २०१४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज भारतीय जनता पक्षाचे आदर्श नेते म्हणजे पंतप्रधान ज्यांनी गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी २००२ साली दंगलीचा कट रचला. तर, दुसरे म्हणजे गुजरातचे माजी गृहमंत्री, जे अडीच वर्षांसाठी तडीपार होते. भाजपाचे हे आदर्श गुंड देशाच्या हितासाठी काहीही करत नसल्याचं करुणा शुक्ला यांनी म्हटलं आहे.

भाजपाकडून अटलजी, अडवाणीजी आणि भाजपाच्या विचारसरणीशी तडजोड केली जात आहे. राष्ट्रवाद हाच सध्या भाजपा आणि आरएसएससाठी राजकारणाचा मुद्दा बनला आहे. मोदी आणि शहा यांच्याकडून भारत माता की जय, वंदे मातरम यांसारख्या मुद्द्यांवरुन देशभक्तीचं राजकारण केलं जात आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(239)#Narendra Modi(1262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x