अजब | गुजराती शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंब्याबाबत घोषणा मुख्यमंत्र्यांकडून | शेतकऱ्यांकडून नाही

गांधीनगर, ७ डिसेंबर: कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. मोठ्या संख्येनं या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस भारत बंदमध्ये सहभागी झाला आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये अशा प्रकारचा कोणताही बंद पाळला जाणार नाही, असं मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्पष्ट (Gujarat Chief Minister Vijay Rupani clear stand over tomorrow’s Bharat Bandh) केली आहे. गुजरातमधील शेतकरी आणि APMC मधील विविध व्यापारी यांचा भारत बंदला पाठिंबा नाही. त्यामुळे गुजरातमध्ये ८ डिसेंबरला असा कोणताही बंद पाळण्यात येणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की उद्याचा हा बंद अयशस्वी ठरेल. जर कोणी बळजबरी करून दुकाने किंवा इतर आस्थापने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सरकारच्या वतीने मी हमी देतो की राज्यात कोठेही हिंसक घटना घडणार नाही. आणि मुद्दाम कोणी तसाच प्रयत्न केला तर त्याला योग्य ते शासन केले जाईल”, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिली.
#WATCH | गुजरात में किसानों और APMC की तरफ से भारत बंद को सपोर्ट नहीं है। गुजरात में ऐसी कोई स्थिति नहीं है। कल ये बंद सफल नहीं रहेगा। सरकार ने भी पूरी व्यवस्था की है कि बंद के नाम पर कोई हिंसक घटना न घटे: गुजरात CM विजय रूपाणी pic.twitter.com/22vnTXfV4O
— ANI_HindiNews (@AHindinews) December 7, 2020
News English Summary: Gujarat Chief Minister Vijay Rupani has clarified that no such bandh will be observed in Gujarat. Farmers in Gujarat and various traders in APMC do not support Bharat Bandla. Therefore, no such bandh will be observed in Gujarat on December 8. I am confident that tomorrow’s shutdown will fail. If anyone tries to close shops or other establishments by force, they will be severely punished.
News English Title: Gujarat Farmers APMC not supporting Bharat Bandh on 8 December Says CM Vijay Rupani News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Adani Group Stocks | अदानी ग्रुप आता या क्षेत्रात प्रवेश करणार | या कंपनीच्या माध्यमातून करणार व्यवसाय
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Stock Market Crash | शेअर बाजार धडाम | सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला | निफ्टी 15809 वर बंद
-
Penny Stocks | या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 5 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी