6 July 2020 4:08 AM
अँप डाउनलोड

मला नेहरुंचं ‘ते’ भाषण खूप आवडतं : नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा दाखला देत, त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे प्रामाणिकपणे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले की, ‘पंडित जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला अत्यंत आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी स्वतः समस्या बनून राहणार नाही.

यावेळी गुप्तचर विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना गडकरी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, ‘सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे जर एखाद्याने चुकीचं केलं तर आपण सुद्धा त्याला तशीच प्रतिक्रया द्यायची ही मानसिकता अजिबात ठीक नाही. पंडित नेहरुंनी म्हटले होते की, ‘भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यास सक्षम नसल्यास किमान आपण या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंच भाषण मला अत्यंत आवडतं, असं सुद्धा गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ‘विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट आहे. आपण सर्वांसी विनम्रतेने बोलता, चांगले बोलता. हे सर्वांना आकर्षित करु शकते परंतु, यामुळे आपण देशातील निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्ही विद्वान असू शकता, परंतु हे जरुरी नाही की लोकांनी तुम्हाला मतं दिली पाहिजेत. ज्यांना असं वाटतं की त्यांना सगळ कळतं तर त्यांचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. आत्मविश्वास आणि अहंकार या दोन्हीमध्ये फार अंतर आहे. आपल्याला आत्मविश्वासू असायला हवा, परंतु अहंकारा पासून सुद्धा वाचायला हवं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x